Ad will apear here
Next
काळोखाला भेदणारा प्रकाश समोर असतोच...


काळोखाला भेदणारा प्रकाश समोर असतोच...
जर त्याच्याकडे पाहायची हिंमत असेल तरच...
जर स्वत: प्रकाश होण्याची हिंमत असेल तरच...

जो बायडेन अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान होण्याच्या सोहळ्यात आमंडा गॉर्मन या २२ वर्षांच्या कवयित्रीनं The Hill We Climb ही अप्रतिम कविता सादर केली. त्यातल्या या शेवटच्या ओळी... 

रॉबर्ट फ्रॉस्ट या कवीनं यापूर्वी जॉन केनेडी यांच्या शपथविधी सोहळ्यात आणि माया अँजेलू या कवयित्रीनं बिल क्लिंटन यांच्या शपथविधीच्यावेळी कविता सादर केल्या होत्या. कालच्या सोहळ्यात लेडी गागा आणि जेनिफर लोपेझ यांच्या बरोबरीनं आमंडानं सादर केलेली कविता अनेकांचं मन जिंकून गेली. 



‘या न संपणाऱ्या काळोख्या रात्री कधी संपणार आहेत का, असं आम्ही स्वत:ला विचारत होतो’ अशा विचारांनी सुरुवात झालेल्या या कवितेत ‘आम्ही शोकमग्न असलो तरी आमचा विकास करून घेतला, आम्ही थकलो तरी प्रयत्न सोडले नाहीत’ असे सकारात्मक विचार ठिकठिकाणी दिसतात. 

खास त्या सोहळ्यासाठी असलेली ही कविता ‘आम्ही सामर्थ्य आणि करुणा एकत्र केली, योग्य त्या दिशेनं वाटचाल केली, तर प्रेमाचा वारसा पुढे जाईल आणि प्रेम हा आमच्या मुलांचा जन्मसिद्ध हक्क बनेल,’ असा वैश्विक विचार मांडते हे सर्वांत महत्त्वाचं!

आमंडाचा The One for Whom Food Is Not Enough हा कवितासंग्रह वाचायलाच हवा..

७२३ शब्दांची The Hill We Climb ही कविता वाचायची आणि ऐकायची असेल तर लिंक्स सोबत आहेत.

- नीलांबरी जोशी

(कविता वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)


 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OUXTCU
Similar Posts
View of the current racial situation from an African American Hindu/Vedic leader I grew up in the South during the 1950s and 60s. Those were troublesome times for the African American community. We were identified as Negroes and as an ethnic minority, it was very difficult to understand what our place in the world was. Honestly, there was an element of shame associated with being black
गणिताचे भावविश्व तरलतेने मांडणारे डॉ. केदार हर्डीकर गणितासारख्या रुक्ष शास्त्राचा, डॉक्टर केदार हर्डीकरांइतका हळवा inference याआधी कुणी केला असेल, असे मला वाटत नाही. त्यांचे Abstract Intersection हे पुस्तक एक अद्भुत पुस्तक आहे. चमत्कार वाटावा इतके. कारण गणित आणि कविता या दोन अगदी भिन्न गोष्टी आहेत. त्यांच्या वृत्ती-प्रवृत्ती या संपूर्णपणे वेगळ्या आहेत
जॉर्ज फ्लॉइडच्या देशा... सध्या जॉर्ज फ्लॉइडच्या दुर्दैवी हत्येने अमेरिकेचे अंतरंग पेटून उठले आहे. कधी नव्हे ते इतक्या मोठ्या प्रमाणावर लोक रस्त्यावर येऊन आंदोलने करत आहेत. या सगळ्या गदारोळात मुख्य प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करताना कुणीही दिसत नाही. एकूणच मानवजातीचा इतिहास हा अत्यंत हीन कृत्यांनी आणि क्रौर्यानी भरलेला असाच आहे
बोस्टन टी पार्टी! अमेरिकेच्या पूर्व किनाऱ्यावरील बोस्टनच्या आणि अमेरिकेच्याच नाही, तर जगाच्या इतिहासाला कलाटणी देणाऱ्या घटनांपैकी एक म्हणजे बोस्टन टी पार्टी. या अद्भुत घटनेचा आज (१६ डिसेंबर) वर्धापनदिन! अमेरिकेचं स्वातंत्र्य मिळवून नंतर हा वसाहतींचा देश जगातील समृद्ध व सशक्त राष्ट्र बनवणाऱ्या सर्व अमेरिकनांना मानाचा

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language